News Flash

गुजरातमध्ये पाचवी नापास आमदारानं दिलं करोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन

करोना रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये इंजेक्शन सिरींज रिकामी केली

करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तर दुसरीकडे राजकारणी करोनाकाळातही आपली प्रतिमा जपण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. गुजरात येथील कामरेजचे भाजपचे आमदार व्ही. डी. झालावाडिया हे करोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे.

झालावाडिया हे सूरत महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये एका करोना रुग्णाच्या सलाईनमध्ये रेमडेसिवीर इंजेश्कन भरत होते. त्यानंतर त्यांनी रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये ते इंजेश्कन सिरींज रिकामी केली. व्ही. डी. झालावाडिया हे स्वतः पाचवी नापास आहेत आणि अशा प्रकारे वैद्यकीय कर्मचाऱ्यासमोर करोना रुग्णावर उपचार कसा करु शकतात असा सवाल काँग्रेसने केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालावाडिया यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मी गेल्या ४० दिवसांपासून सर्थाना कम्युनिटी हॉलमध्ये स्वयंसेवा करत आहे आणि करोना रुग्णांना मदत करीत आहे. कोणत्याही वादात पडण्याचा माझा हेतू नाही. मी फक्त रेमडेसिवीरचे इंजेक्शन सिरिंजमध्ये भरले आहे. कोणालाही इंजेक्शन दिले नाही. माझ्या जवळ त्यावेळी १०-१५ डॉक्टर उपस्थित होते. मी जवळपास २०० लोकांची मदत करुन त्यांनी घरी पाठवले आहे,” असे झालावडिया म्हणाले.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते जयराज सिंह यांनी झालवडिया यांच्यावर टीका केली आहे. वैद्यकीय कर्मचार्‍यांनी आमदाराकडून शिकले पाहिजे. रुग्णालयात आमदारांचा पुतळा देखील उभारालयला हवा असा टोला जयराज सिंह यांनी लगावला आहे.

गुजरातमध्ये करोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात विकली जात होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२० मध्ये गुजरात सरकारने रेमडेसिवीरची टंचाई निर्माण झाली तेव्हा या औषधांची खरेदी वाढविली होती. एप्रिलमध्ये जेव्हा मागणी वाढली तेव्हा सरकारने रेमडेसिवीरचा अति वापर न करण्याचा सल्ला दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 5:54 pm

Web Title: gujarat mla class 5 dropout seen filling syringe with remdesivir abn 97
Next Stories
1 पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर
2 पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघी बहिणींना मध्य प्रदेशात अटक
3 मोदींनी नेमका त्याच दिवशी मास्क का नव्हता घातला? – नवाब मलिकांचा खोचक प्रश्न
Just Now!
X