हैदराबादमध्ये पशुवैद्यक महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याच्या घटना ताजी असताना व देशभरासह संसदेतही याबद्दल संतप्त पडसाद उमट असतानाच, आता छत्तीसगडमध्ये देखील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेसह तिच्या बाळाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

रायपुरमधील नक्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या अगोदर छत्तीसगडमधील बलरामपुरमध्ये पोलिसांना एक तरूणीचा जळालेला मृतदेह आढळला होता. पोलिसांना असा संशय आहे की, या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. जनावरं चारणाऱ्या एका व्यक्तीस दिसला होता.

आज संसदेत हैदराबातमधील घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली आहे. शिवाय, या घटनेमुळे संपूर्ण देशाला लाज आणली आहे. यामुळे प्रत्येकालाच दुःख झाले आहे. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. महिलांविरोधातील अशाप्रकारचे गुन्हे संपुष्टात आणण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कायद्याची निर्मिती करण्यास आहोत, ज्यासाठी संपूर्ण सभागृह देखील सहमत असेल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.