अल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला असून, पीडित मुलीने पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत गेली अडीच वर्ष प्रशिक्षक आपल्यावर बलात्कार करत असल्याचं म्हटलं आहे. गुरुग्राम, रोहतक यांसारख्या ठिकाणी प्रशिक्षकाने विविध बहाणे करत आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने म्हटलं आहे.
मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पॉस्को कायद्यानुसार प्रशिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रशिक्षकाने पीडित मुलीला घडलेल्या घटनेबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याला घाबरुन मुलीने याबद्दल कोणाकडे तक्रार केली नव्हती. अखेर प्रशिक्षकाकडून होत असलेला त्रास वाढत गेल्याने मुलीने आपल्या पालकांकडे याबद्दल तक्रार केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 11:15 am