News Flash

सोळाव्या वर्षी सर केलं माउंट एव्हरेस्ट , शिवांगी पाठकचा पराक्रम

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणे कसलेल्या गिर्यारोहकालाही आव्हानात्मक असते.

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणे कसलेल्या गिर्यारोहकालाही आव्हानात्मक असते. मात्र, अवघ्या 16 वर्षांच्या शिवांगी पाठक हिने गुरुवारी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला. दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं शिवांगीने सांगितलं. अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत.

एव्हरेस्टची यशस्वी चढाई करणं, हे स्वप्न होतं आणि याद्वारे महिला कोणतंही लक्ष्य पार करण्यासाठी सक्षम आहेत हे दाखवून द्यायचं होतं, असं शिवांगी म्हणाली. वयाच्या दहाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा यांचा व्हिडीओ शिवांगीने पाहिला होता. अरुणिमा यांचा व्हिडीओ पाहून ती इतकी प्रभावित झाली की तेव्हापासून तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला. त्यानंतर शिवांगीने गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणादरम्यान शिवांगीने केदारनाथ, बद्रीनाथच्या मोठमोठ्या टेकड्या पार केल्या.

हरिणायाच्या हिसारमध्ये राहणाऱ्या शिवांगीने ‘सेव्हन समिट ट्रेक’मध्ये सहभागी होऊन एव्हरेस्टची चढाई करण्याचा पराक्रम केला आहे. शिवांगीचे वडील राजेश पाठक हे व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 9:37 am

Web Title: haryanas shivangi pathak scale mt everest at age of 16
Next Stories
1 जाणून घ्या, ब्रिटीश राजघराण्याच्या होणाऱ्या सूनेबद्दल
2 प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?
3 असा असेल शाही विवाहसोहळ्याचा केक; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
Just Now!
X