मिझोराम विधानसभेच्या निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी जवळपास चार हजार निवडणूक अधिकाऱ्यांना संबंधित स्थळापर्यंत पोहोचविण्यासाठी अवजड वाहने, दुचाकी, लहान बोटी आणि पायपीट असा प्रवास करावा लागत आहे.
मिझोरामच्या अत्यंत दुर्गम भागांत अधिकाऱ्यांना पोहोचता यावे यासाठी या सर्व वाहनांचा वापर करावा लागत असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी सांगितले.अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी १८०० हून अधिक वाहनांचा वापर केला जात असून त्यामध्ये २२९ बसगाडय़ा, १२ लहान बोटी, दुचाकी आणि अन्य २७ ठिकाणी पायवाटेचा वापर करावा लागत असल्याचे अश्विनीकुमार म्हणाले. मिझोराम राज्याची २१ हजार कि.मी. क्षेत्रात पसरले असून डोंगरदऱ्या, तलाव, नद्या अशा ठिकाणी काही मतदान केंद्रे आहेत. निवडणूक आयोगाने ५८०६ सुरक्षा अधिकारीही तैनात केले आहेत.मिझोरामच्या ४० विधानसभा मतदारसंघातून एकूण १४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एकूण १० लाख लोकसंख्येपैकी ६.८६ लाख मतदारांची नोंदणी झाली आहे.
मिझोरामच्या ४० विधानसभा मतदारसंघातून एकूण १४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एकूण १० लाख लोकसंख्येपैकी ६.८६ लाख मतदार आहेत.

मिझोराम निवडणुकीसाठी ब्रू मदत छावण्यांमध्ये ७० टक्के मतदान
ऐझवाल : त्रिपुराच्या उत्तरेकडील भागांत असलेल्या सहा ब्रू मदत छावण्यांमधून ७० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.नइसिंगपारा, असापारा, हझाचेरा, खाकचांगपारा, कासकाऊ आणि हमासपारा या ठिकाणी असलेल्या मदत छावण्यांमध्ये मंगळवारी सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली.मतदानाची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याने आयोगाने गुरुवापर्यंतची मुदत दिली होती.