अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडी ही संस्था मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकरणांसाठी चर्चेत आहे. मात्र अनेकांना ‘ईडी’ म्हणजे काय? या संस्थेची स्थापना कधी झाली? ही संस्था कशी काम करते? आतापर्यंत कोणत्या घोटाळ्यांची चौकशी ईडीने केली आहे? ईडीवर होणारे आरोप कोणते? ईडीचा रेकॉर्ड कसा आहे याबद्दल खूप कमी माहिती आहे. हेच सर्व जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न….

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘ईडी’ची नोटीस आल्याच्या चर्चांमुळे ही संस्था विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आहे.