25 November 2017

News Flash

बलात्काराच्या घटनेसंदर्भात गृहमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

केंद्रीय गृहमंत्री आणि इतर उभय नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिल्ली सामूहिक बलात्काराच्याघटने संदर्भात

नवी दिल्ली | Updated: December 22, 2012 6:32 AM

केंद्रीय गृहमंत्री आणि इतर उभय नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिल्ली सामूहिक बलात्काराच्याघटने संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या प्रकरणावर मी स्वत: लक्ष ठेवून असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधानांना सांगीतले. दिल्लीकरांमध्ये सुरक्षेची भावना रुजवा आणि बलात्काराच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घ्या असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सांगितले आहे. या बलात्काराच्या घटनेवरून देश भरात ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चा, निदर्शने केली जात आहेत. या घटनेमुळे दिल्लीसह देशभरातील पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तरीसुद्धा संपुर्ण देशभरात दर दिवसाआड बलात्काराच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. याचीच प्रतिक्रीया आज दिवसभर दिल्लीत पहायला मिळाली. देशभर, या बलात्कारी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली जात आहे त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची हि भेट महत्वपूर्ण असल्याचे वर्तवण्यात येत आहे.

First Published on December 22, 2012 6:32 am

Web Title: home minister met prime minister on rape case