भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्पती क्षी जिनपिंग यांचे नाव उच्चारण्यात चूक केल्यामुळे दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाला आपली नोकरी गमवावी लागली. दूरदर्शनच्या या वृत्तनिवेदकाने जिनपिंग यांच्या नावाअगोदरील ‘XI’ चा अर्थ रोमन लिपीतील ११ आकडा असा गृहीत धरून, त्यांचा उल्लेख ‘अकरावे जिनपिंग’ असा केला. या लाजिरवाण्या चुकीनंतर संबंधित वृत्तनिवेदकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दूरदर्शनवर गुरूवारी रात्री उशीरा प्रसारित करण्यात आलेल्या बातमीपत्र वाचताना संबंधित वृत्तनिवेदकाकडून ही चूक घडली.