News Flash

चायनीज कंपनीनं PM फंडासाठी दिले सात कोटी रुपये

नेटकऱ्यांनी चीनकडून मदत घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

चायनीज टेलीकॉम गिअर मेकर कंपनी हुआवेनं पीएम केअर फंडासाठी सात कोटी रुपये दिल्याचं समोर आलं आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतातील सहा राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर करोनाविरोधात लढण्यासाठी हुआवे या कंपनीनं डायरेक्ट पीएम केअर फंडात सात कोटी रुपये दिलं आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हुआवे या कंपनीनं काही दिवसांपूर्वीच भारताला शरीराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शविली होती.

हुआवे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चेन यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सला सांगितलं की, “चीनमधील आमचा अनुभवाद्वारे भारतातील सध्याच्या करोनाच्या स्थिती विरोधात लढण्यासाठी शरिराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञानचा अभ्यास करत आहे. यात लवकरच आम्हाला यश येईल.” हुआवे कंपनीनं दिलेली मदत सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांनी चीनकडून मदत घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर काहींनी टिकटॉकने किती मदत केली? अशी विचारणा केली आहे.

दरम्यान, करोनाविरोधात लढण्यासाठी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांनी आधीच पीएम केअर फंडासाठी आपली मदत दिली आहे. रिलायन्स जिओने ५०० कोटी तर भारती एअरटेलने १०० कोटी रुपयांची मदत पीएम केअर फंडासाठी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:52 pm

Web Title: huawei contributes rs 7 cr to pm cares fund nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदींनी काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं केलं कौतुक
2 लहान मुलांनी आजी आजोबांची मोबाइलवर मुलाखत घ्यावी, मोदींचं आवाहन
3 वर्षभरात ५० संकटं आली तरीही डगमगून जायची गरज नाही – मोदी
Just Now!
X