News Flash

दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध प्रियकराने प्रेयसीवर सुऱ्याने केले वार

रस्त्याच्या मधोमध विव्हळत पडलेली तरुणी मदतीसाठी याचना करत होती.

दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध प्रियकराने प्रेयसीवर सुऱ्याने केले वार

भर दिवसाढवळ्या एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीवर धारदार सुऱ्याने हल्ला केला. कर्नाटकात हुबळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हुबळीच्या देशपांडे नगरमध्ये भरदिवसा रस्त्याच्या मधोमध तरुणीवर क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपीला लगेच अटक करण्यात आली. पण या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये महिला रस्त्याच्या मधोमध पडलेली दिसत असून आरोपी त्याच्याजवळच्या सुऱ्याने तिच्यावर वार करताना दिसतो. आरोपी त्याच्याजवळच्या सुऱ्याने तरुणीच्या डोक्यावर आणि गळयावर वार करतो. रस्त्याच्या मधोमध विव्हळत पडलेली तरुणी मदतीसाठी याचना करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपण दिसते.

दिवसाढवळ्या हा प्रकार घडला पण मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. तरुणी तिथे पडल्यानंतर परिचयाची एक व्यक्ती तिथे आली व त्याने आरोपीला रोखले. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून तो रिक्षाचालक आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 6:46 pm

Web Title: hubbali man hacks lover with machete in broad daylight dmp 82
Next Stories
1 पती, पत्नी और पार्टी…! पत्नीने तृणमूलमध्ये केला प्रवेश, भाजपा खासदाराने दिली घटस्फोटाची धमकी
2 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन
3 मोदी सरकारच्या काळात ‘युपीए’पेक्षा तीन पटींपेक्षा जास्त कर्ज ‘राईट ऑफ’; आरटीआयमधून समोर आली माहिती
Just Now!
X