अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये ३९ इमारतीमध्ये गॅस पाईलाईनचे ७० स्फोट झाले आहेत. यामध्ये एका १८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. गुरूवारी बोस्टन शहरामधील काही घरामध्ये अचानक गॅसचे स्फोट झाले. त्यानंतर बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. घटनास्थळावरून शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोलिस आणि अग्निशामक दलाचे मोठ्याप्रमाणात बचावकार्य सुरू आहे.

प्रत्येक्षदर्शीने असलेल्या लोकांनी माध्यमांना दिलेल्ला माहितीनुसार, आतापर्यंत घरगुती गॅस पाईपलाईनचा जवळपास 70 वेळा स्फोट झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले. जखमी अवस्थेत १८ वर्षीय लिओनेल रोंडनला बोस्टनमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अचानक ही दुर्घटना सुरू झाली. बोस्टन शहराजवळील लॉरेन्स, एन्डोवर आणि दक्षिण एन्डोवरमधील अनेक इमारतीमध्ये स्फोट झाले. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, या स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. तपास पथक याचा शोध घेत आहेत. लवरच घटनेचे कारण समोर येईल.

वेगवेगळ्या घरांमध्ये आणि इमारतीमध्ये आतापर्यंत २३ स्फोट झाल्याची माहिती मॅसॅच्युसेट्स स्टेट पोलिसांनी दिली. पण स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आजूबाजूच्या घरामध्ये यापेक्षा आधिक स्फोट झाले आहेत. गॅस पाईपलाईन अपग्रेड करण्याचं काम सुरू असताना हे स्फोट झाले. सुरक्षारक्षकांना गॅसचा वास आल्यानंतर त्यांनी तात्काळ लोकांना सुरक्षित स्थळी हालवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या परिसरातील वीज काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.