दोन दिवसांपुर्वी ज्या पत्नीसोबत आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या त्याच पत्नीवर पतीने आपल्या मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुंडा दिला नाही या एकमेव कारणामुळे पतीने आपल्या पत्नीवर बलात्कार केला. आसाममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. १७ एप्रिल रोजी आरोपी पतीने आपल्या मित्रांसोबत मिळून पत्नीचा सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दोघांनाही पाहताक्षणी अटक करण्याचा आदेश दिला आहे. पीडित महिला गंभीररित्या जखमी झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीने हुंडा म्हणून सोन्यान्या दागिन्यांची मागणी केली होती. पण जेव्हा पत्नीच्या कुटुंबियांनी मागणी पूर्ण केली नाही तेव्हा त्याने मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला.

कठुआ आणि उन्नाव बलात्कारानंतर १२ वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. मात्र आसाममध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा कमी होताना दिसत नाहीये. एका रिपोर्टनुसार, गेल्या दोन महिन्यात एकट्या आसाममध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची २० प्रकरणं समोर आली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband gangraped wife with friend over demand of dowry
First published on: 24-04-2018 at 16:17 IST