18 January 2020

News Flash

हैदराबाद : आरोपीची पत्नी म्हणाली, मलाही त्याच ठिकाणी नेऊन गोळी घाला

पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात चार आरोपी ठार झाले होते.

तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. तसंच त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. यानंतर त्यातील एका आरोपीच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी माझे पती ठार झाले त्या ठिकाणी मला नेऊन गोळी घाला, अशी प्रतिक्रिया एका आरोपीच्या पत्नीनं व्यक्त केली आहे.

तर आपला मुलगा ठार झाला हे ऐकून आपल्याला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया अन्य एका आरोपीच्या आईनं दिली. माझ्या मुलाने जर गुन्हा केला असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी असं त्या आरोपीच्या वडिलांनी म्हटलं होती. तर आता आपल्याकडे जगण्यासाठी काहीही उरलं नसून माझ्या पतीला ज्या ठिकाणी ठार केलं त्याच ठिकाणी मलाही नेऊन मारा अशी प्रतिक्रिया एका आरोपीच्या पत्नीनं दिली आहे. पतीला काहीही होणार नाही, तो लवकरच घरी परतेल, असं आपल्याला सांगितलं होतं असंही ती म्हणाली.

आपल्या मुलानं कदाचित हा गुन्हा केलाही असेल परंतु त्याचा असा अंत व्हायला नको होता. अनेक लोक बलात्कार करतात, खून करतात पण त्यांची अशी हत्या केली जात नाही, त्यांना अशी वागणूक का दिली जात नाही, असा सवाल एका आरोपीच्या वडिलांनी उपस्थित केला.

First Published on December 7, 2019 11:19 am

Web Title: hyderabad rape case accused wife reactions in shocked jud 87
Next Stories
1 हैदराबादमधील आरोपींप्रमाणेच शिक्षा द्या; उन्नाव पीडितेच्या वडिलांची मागणी
2 #HyderabadEncounter : ९ डिसेंबरपर्यंत आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवा; न्यायालयाचे आदेश
3 एअरटेलच्या ग्राहकांना दिलासा; केली ‘ही’ मोठी घोषणा
Just Now!
X