News Flash

मी रॅम्बो नाही: नितीशकुमारांचा मोदींना टोला

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तराखंडच्या आपत्तीमधून बिहारींना सोडवण्यासाठी तिथे जाणारा मी काही रॅम्बो नाही, अशा शब्दात

| July 2, 2013 01:38 am

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तराखंडच्या आपत्तीमधून बिहारींना सोडवण्यासाठी तिथे जाणारा मी काही रॅम्बो नाही, अशा शब्दात त्यांनी मोदींना टोला लगावला. गेल्या आठवडय़ात मोदी यांनी उत्तराखंडला जाऊन १५ हजार गुजराती नागरिकांची सुटका केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर काँग्रेसने मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत इतक्या कमी वेळात नागरिकांची सुटका करणारे मोदी काय रॅम्बो आहेत काय, अशी उपहासात्मक टीका केली होती. मात्र मोदींनी इतक्या मोठय़ा प्रमाणात लोकांना सोडवण्याचा दावा केलाच नव्हता, असे स्पष्टीकरण भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिले होते. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या वृत्तानंतर मोदींचा समाचार घेतला होता. आता नितीशकुमारांनीही मोदींना लक्ष केले आहे. मोदींची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर  संयुक्त जनता दलाने भाजप बरोबरची १७ वर्षांची युती तोडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 1:38 am

Web Title: i am not a rambo chief minister says nitish kumar
टॅग : Nitish Kumar
Next Stories
1 भेसळयुक्त दूधविक्रीबद्दल सर्वोच्च न्यायालयाला चिंता
2 इशरत जहॉं चकमक: ‘सीबीआय तपास अधिकाऱयांना अधिक सुरक्षा द्या’
3 अकार्यक्षम उत्तराखंड सरकार बरखास्त करा – सुषमा स्वराज
Just Now!
X