काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब कॅबिनेटमधून राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना अमरिंदर सिंग यांनी म्हटेल की, मला आज सिद्धू यांचा राजीनामा मिळाला आहे. तो वाचून त्यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाईल.
Punjab CM on Navjot Singh Sidhu: I have no issues with him, I had in fact given him a very important portfolio after the reshuffle. It was his decision to quit the Cabinet. I have been told that he has sent the letter to my office, will go through it&then see what is to be done. https://t.co/PhWK9OmY7M
— ANI (@ANI) July 15, 2019
तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, मला त्यांची काहीच अडचण नाही. उलट मी त्यांना मंत्रींडळाच्या पुनर्ररचनेनंतर तर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देऊ केली होती. कॅबिनेटचा राजीनाम देण्याचा त्यांचा निर्णय होता. मला हे सांगण्यात आले आहे की, त्यांनी माझ्या कार्यालयाला पत्र पाठवले आहे. आम्ही ते पाहू व त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ठरवू.
मी त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांना देखील कधीच विरोध केला नाही. उलट मी एकमेव आहे की ज्याने राहुल गांधींकडे त्यांना भटींडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी यासाठी शिफारस केली होती. मात्र तेव्हा सिद्धू यांनीच त्यांची पत्नी भटींडा येथून लढणार नसल्याचे सांगत, त्या चंडीगढ येथून लढणार असल्याचे जाहीर केले होते. खरतर हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता. याबाबत पक्ष निर्णय घेत असतो.