इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरिता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जेईई अर्थात सामाईक प्रवेश परीक्षेचा (अॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला. या परीक्षेत पंचकुलाचा सर्वेश मेहतानी हा देशात पहिला आला आहे. विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
देशभरातील १ लाख ७० हजार विद्यार्थी २१ मे रोजी जेईई- अॅडव्हान्स परीक्षेला बसले होते. देशातील २३ आयआयटीमधील सुमारे ११ हजार जागांसाठी ही परीक्षा पार पडली होती. जेईई मेन्समध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. जेईई अॅडव्हान्समधील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांची आयआयटी आणि धनबाद येथील माइन संस्थेसाठी निवड होणार आहे. सात टप्प्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रीया पार पडणार आहे.
जेईई अॅडव्हान्समध्ये राजस्थानचा सूरज देशात पाचवा आला आहे. सूरजला ३६६ पैकी ३३० गूण मिळाले आहे. सूरजचे वडील हे कंत्राटी शिक्षक असून आई गृहीणी आहे. सूरज हा राजस्थानच्या कोटामधील व्हायब्रंट अॅकेडमीचा विद्यार्थी आहे.पुण्यातील अक्षत चुघ हा देशात दुसरा आला आहे. देशात पहिल्या आलेल्या सर्वेशला ३६६ पैकी ३३९ गूण मिळाले आहेत. जेईई मेन्समध्ये तो ५५ वा होता. सर्वेश हा चंदीगडचा विद्यार्थी आहे.
निकाल कसा पाहता येणार ?
> विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
> संकेतस्थळावर रिझल्ट ऑफ जेईई (अॅडव्हान्स) या लिंकवर क्लिक करा.
> पेजवरील सेक्शनमध्ये अॅडव्हान्स अॅप्लिकेशन नंबर टाकावा लागेल.
> तुमची जन्मतारीख टाकावी लागेल.
> तपशील भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा आणि तुमच्यासमोर निकालाची प्रत येईल.