News Flash

इम्रान खान होमोसेक्शुअल, घटस्फोटित पत्नीचा खळबळजनक आरोप

इम्रान खानची घटस्फोटित पत्नी रेहम खानने एक पुस्तक लिहिले आहे, या पुस्तकात हे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

imran-khan
इम्रान खान. (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानचा गोलंदाज आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केलेला खेळाडू म्हणजे इम्रान खान. तेहरीक ए इन्साफ हा त्याचा राजकीय पक्ष. इम्रान खानच्या खेळ आणि राजकारणापेक्षा त्याच्या लग्नांची आणि घटस्फोटांची चर्चाच जास्त होताना दिसते. अशातच त्याच्यापासून घटस्फोट घेतलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. इम्रान खान होमोसेक्शुअल आहे, त्याचे तेहरीक-ए-इन्साफच्या पुरुष सदस्यांसोबत संबंध आहेत असा आरोप रेहम खानने केला आहे.

रेहम खान यांनी एक पुस्तक लिहिले आहे या पुस्तकाचे प्रकाशन होणे बाकी आहे. मात्र या पुस्तकात हे सगळे उल्लेख असल्याची माहिती समोर येते आहे. रेहम खान यांच्या या पुस्तकामुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माझे आणि इम्रान खान यांचे सेक्स रिलेशन कधीही चांगले नव्हते असेही रेहम खानने या पुस्तकात म्हटले आहे.

रेहम खान यांनी तहरीक ए- इन्साफ च्या पुरुष सदस्यांसोबत इम्रान खानचे संबंध असल्याचेही म्हटले आहे. मात्र या वक्तव्याबाबत मुराद सईद यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. रहेम खान यांनी अत्यंत खालच्या शब्दात इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. रेहम यांनी त्यांच्या पुस्तकात जे लिहिले आहे त्याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. मात्र त्यांची भाषा अशोभनीय आहे असे ट्विट मुराद सईद यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.

रेहमने फक्त इम्रान खानच नाही तर वसिम अक्रमवरही गंभीर आरोप केले आहेत. वसिम अक्रमने त्याच्या सेक्ससंदर्भातल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडले होते. रेहम यांनी पुस्तकात हाही उल्लेख केला आहे की वसिम अक्रम त्याच्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करत असताना पाहात होता. हे सगळे आरोप झाल्यावर वसिम अक्रमने रेहम खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तर इम्रान खानवर झालेल्या आरोपानंतर त्यांची पहिली पत्नीही चिडली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाले तर मी रेहम खानवर केस करेन असे जेमिमा गोल्डस्मिथने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 3:46 pm

Web Title: imran khan homosexual had relationships with men says his ex wife
Next Stories
1 ताजमहल नाही राम महल किंवा कृष्ण महल म्हणा! भाजपा आमदाराची अजब मागणी
2 यशस्वी होण्यासाठी धीरुभाई अंबानींची ‘ही’ १० वाक्ये तुम्हाला नक्कीच देतील प्रेरणा
3 काँग्रेस प्रणव मुखर्जींवर नाराज? नाही दिले इफ्तार पार्टीचे निमंत्रण
Just Now!
X