पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लंडन दौऱ्यादरम्यान पार्लमेंट स्क्वेअर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रध्वजच्या अवमान प्रकरणावर भारताने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाची दखल लंडन सरकारने घेतली असून या गोष्टीवर खंत केली असल्याचे लंडनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

तसेच लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये भारतीय राष्ट्रध्वजच्या अवमान प्रकरणावर लंडन सरकारने दु:ख व्यक्त केले आहे. हा मुद्दा सरकारने अतिशय तातडीने उचलला असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे लंडनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. आम्ही आशा करतो की, या प्रकरणी दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षा होईल.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चार दिवसांच्या लंडन दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींच्या लंडन दौऱ्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या दरम्यान भारतातील अत्याचारांच्या विरोधात काहींनी आंदोलन केली. याच आंदोलना दरम्यान काही निदर्शक आक्रमक झाले व त्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमान केला त्यानंतरच हे प्रकरण समोर आले आहे.