24 September 2020

News Flash

UNSC मध्ये काश्मीर मुद्दावरुन चीन-पाकिस्तान दोघेही पडले तोंडावर

आमच्या अंतर्गत विषयात अजिबात हस्तक्षेप करु नका, भारताने चीनला ठणकावलं

फोटो सौजन्य - रॉयटर्स

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने आज फटकारले. आमच्या अंतर्गत विषयात चीनचा हस्तक्षेप अजिबात मान्य नाही, असे भारताने स्पष्ट केले.

“जम्मू-काश्मीर या भारताच्या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. चीनने पहिल्यांदाच भारताचा अंतर्गत विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. यापूर्वी सुद्धा चीनच्या अशा प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळालाय” असे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे.

बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने चीनच्या समर्थनाने काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. कालच जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले, चीन-पाकिस्तानचा हा प्रयत्न मात्र यशस्वी होऊ शकला नाही. भारत-चीनमध्ये पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती असताना चीनने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:24 pm

Web Title: india firmly rejects chinas attempt to raise kashmir issue at un security council dmp 82
Next Stories
1 काश्मीर मुद्द्यावर पत्रक प्रसिद्ध करण्यापुरता टर्कीचा भारत विरोध मर्यादित नाही तर..
2 कानामागून आल्या, पण..
3 सावधान! करोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायसरचा शिरकाव, सात जणांचा मृत्यू तर ६० जणांना संसर्ग
Just Now!
X