देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. कारण, पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोही आता कोलकाता शहरातून धावणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज (गुरुवार) या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे.

कोलकात्यात पहिली मेट्रो सेवा १९८४ मध्ये सुरु झाली होती. त्याची घौडदौड आज एकविसाव्या शतकातही सुरुच आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल बुधवारी कोलकाता ईस्ट-वेस्ट मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी सर्वसामान्य जनतेसाठी ही सेवा खुली होईल. या मेट्रोची सर्वात खास बाब म्हणजे ही मेट्रो पाण्यात बनवण्यात आलेल्या बोगद्यातून धावणार आहे. त्याचबरोबर ही देशातील सर्वात स्वस्त मेट्रो असणार आहे. एकूण १५ किमीची ही मेट्रो लाईन असणार आहे.

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कमीत कमी भाडं असणार पाच रुपये

या मेट्रोनं एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला जाण्याचं तिकीट केवळ पाच रुपये असणार आहे. दरपत्रकानुसार, दोन किमीसाठी पाच रुपये, पाच किमीसाठी १० रुपये, दहा किमीसाठी २० रुपये त्यानंतर शेवटच्या स्टेशनपर्यंत ३० रुपये इतकं भाडं आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मेट्रोमध्ये प्रवाशांना अनेक सुविधांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, डिटेक्शन सिस्टीमसारखी आधुनिक सुविधा असणार आहे.

देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

या मेट्रोचे सीपीआरओ इंद्राणी बॅनर्जी म्हणाले, “ईस्ट-वेस्ट मेट्रो ही भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो असेल. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन लवकरच हुबळी नदीतूनही मेट्रो मार्ग तयार करणार आहे. ईस्ट-वेस्ट मेट्रो प्रकल्पावर वेगाने काम सुरु आहे. त्यानंतर मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रवाशांना अंडर वॉटर रेल्वेचा रोमांचक अनुभव मिळेल. यापूर्वी रस्त्याच्या मार्गाने शेवटच्या थांब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ लागत होता तो आता १३ मिनिटांत पूर्ण होणार आहे.” सहा कोचची ही अत्याधुनिक मेट्रो असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले.