रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केले होते.

अनेक ठिकाणी लोकांना यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. जिथे थोड्याफार प्रमाणात दुकाने सुरू होते तेथे दिवाळीच्या पणत्या विकायला आल्या होत्या. रात्री ९ वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला होता.

“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं होतं.