भारतात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६,२८२ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्र (४,६८,२६५), तामिळनाडू (२,७३०००), आंध्र प्रदेश (१,७६,३३३), कर्नाटक (१,५००००) आणि दिल्ली (१,४०,२३२) या पाच राज्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. करोनामधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार आतापर्यत १२ लाख ८२ हजार २१५ जणा करोनामुक्त झाले आहेत.

करोना रुग्णांची संख्या देशामध्ये दररोज वाढत असली तरी त्यामागे वाढवण्यात आलेला चाचण्यांचा वेग हे सुद्धा एक कारण आहे. करोना चाचण्यांचा वेग वाढवल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.