30 September 2020

News Flash

पाकिस्तानबरोबर चर्चेस तयार असल्याचा दावा भारताने फेटाळला

केवळ पाकिस्तानकडून मिळालेल्या शुभेच्छांनाच प्रतिक्रिया दिल्याचे केले स्पष्ट

पाकिस्तानबरोबर भारत चर्चेसाठी तयार असल्याचा दावा भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की, भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी शेजारील राष्ट्राबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, नवी दिल्लीच्यावतीने पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की, भारताला पाकिस्तानसह आपल्या शेजारील देशांबरोबर साधारण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत.

रवीश कुमार यांनी हे देखील सांगितले की, परंपरेनुसार राजकीय शिष्टाचाराप्रमाणे पाकिस्तानकडून मिळालेल्या शुभेच्छांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत आम्ही म्हटले होते की, भारत पाकिस्तानसह शेजारील सर्वच देशांबरोबर साधारण व सहकार्याचे संबंध राखू इच्छितो. तर यावर पाकिस्तानी माध्यमांनी बातमी दिली की, भारतात नवे सरकार आल्याबद्दल पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या शुभेच्छांना प्रतिक्रिया देताना भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, पाकिस्तानच्या शुभेच्छांना उत्तर देताना पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयाने सर्व शेजारी देशांबरोबर साधारण आणि शांतीपूर्ण संबंधाबाबत म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रतिक्रियेत विश्वासाचे व दहशतमुक्त वातावरणाचा तसेच हिंसाचारपासून मुक्तीबाबत उल्लेख केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 1:18 pm

Web Title: india rejects pakistan media claims of agreed to hold talks with pakistan msr87
Next Stories
1 काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात?
2 तिहेरी तलाक, निकाह हलाला या अनिष्ट प्रथा जायलाच हव्यात : राष्ट्रपती
3 AN 32 विमान अपघात प्रकरण : 13 जणांचे मृतदेह आणि अवशेष सापडले
Just Now!
X