News Flash

भारताला सर्वात आधी मिळणार ‘कोविडशिल्ड’चे पाच कोटी डोस – अदर पुनावाला

नियामक मंडळाकडून जानेवारीत लसीला मान्यता मिळेल

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सोमवारी एक दिलासादायक बातमी दिली. करोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ला जानेवारीत नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर लसीचे चार-पाच कोटी डोस सर्वात आधी भारतात दिले जातील.

पुनावाला म्हणाले, “आमच्याजवळ कोविशिल्डचे चार-पाच कोटी डोस आहेत. एकदा आम्हाला काही दिवसांत लसीकरणाला परवानगी मिळाली की, आपण किती डोस घेऊ शकतो हे सरकारला निश्चित करावं लागेल. आम्ही जुलै २०२१ पर्यंत सुमारे ३० कोटी डोसची निर्मिती करु.”

२०२१ च्या आधी सहा महिने जागतिक स्तरावर डोस कमी पडतील पण यावर काही उपाय नाही. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत इतर लस निर्मिती कंपन्याही डोसची पूर्तता करण्यास सक्षम होतील, असंही पुनावाला म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 9:20 pm

Web Title: india will be the first to get five crore doses of covidshield vaccine says adar poonawala aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं – अमर्त्य सेन
2 शेतकरी आंदोलन सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं, अन्यथा….; शरद पवारांनी दिला इशारा
3 धक्कादायक… Game of Thrones च्या निर्मात्याची हत्या; चहामधून देण्यात आलं विष