पाकिस्तान व चीन यांच्याबरोबरच्या सीमारेषेवर सुरक्षा वाढवण्यासाठी भारताने रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे विकत घेण्यास मान्यता दिली आहे. अशी पाच प्रगत क्षेपणाष्टद्धr(२२९ो खरेदी केली जात असून त्यांची किंमत ३९ हजार कोटी रूपये आहे. ही क्षेपणाष्टद्धr(२२९ो नाटो देशांनाही हादरवणारी असून त्यांच्या मदतीने ४० कि.मी टप्प्यातील विमाने, लढाऊ विमाने व ड्रोन विमाने तसेच इतर क्षेपणाष्टद्धr(२२९ो यांना लक्ष्य करता येते.
संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखालील शस्त्रास्त्र खरेदी मंडळाची बठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिक वाटाघाटीनंतर प्रत्यक्ष करार केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ डिसेंबरला रशियात अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. या क्षेपणास्त्राच्या खरेदीचा निर्णय ऑक्टोबरपासून विचाराधीन होता. संरक्षण शस्त्रास्त्र खरेदी मंडळाने रशियाशी हा करार सरकार पातळीवर करण्याचे ठरले आहे. एस ४०० क्षेपणाष्टद्धr(२२९ो तनात करण्यास प्रत्यक्षात काही वष्रे लागणार आहेत. पश्चिमकेडील पाकिस्तान सीमेवर तीन व पूर्वेकडे चीनच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे लावल्यानंतर भारताची संरक्षक फळी मजबूत होणार आहे. भारतीय हवाई दलात असलेल्या कमतरता दूर करण्याचा एक भाग म्हणून ही क्षेपणाष्टद्धr(२२९ो खरेदी केली जात आहेत.