01 March 2021

News Flash

एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यास तयार, IAF प्रमुखांचं मोठं विधान

'भारताच्या क्षमतेसमोर चीनची हवाई शक्ती सरस ठरणार नाही'

“इंडियन एअर फोर्स कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन, सर्व आवश्यक भागांमध्ये मजबुतीने हवाई दल तैनात आहे” असे एअर फोर्स प्रमुख आरकेएस भदौरिया सोमवारी म्हणाले. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भदौरिया यांनी हे विधान केले.

“भारताच्या क्षमतेसमोर चीनची हवाई शक्ती सरस ठरणार नाही. पण त्याचवेळी शत्रूला कमी सुद्धा लेखणार नाही” असे भदौरिया यांनी सांगितले. येत्या आठ ऑक्टोंबरला असणाऱ्या एअर फोर्स डेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. “परिस्थिती तशी उदभवलीच तर, उत्तर आणि पश्चिम सीमेवर एकाचवेळी दोन आघाडयांवर युद्ध लढण्यास इंडियन एअर फोर्स तयार आहे” असे एअर फोर्स प्रमुखांनी सांगितले.

राफेलच्या समावेशामुळे पहिला आणि खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे असे भदौरिया म्हणाले. “पुढच्या तीन वर्षात राफेल आणि LCA मार्क १ तेजसची स्क्वाड्रन पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. हवाई दलाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी मिग-२९ चा समावेश करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे” असे भदौरिया यांनी सांगितले.

एअर फोर्स डे च्या दिवशी सगळयांच्या नजरा राफेलकडे असतील. राफेल पहिल्यांदाच फ्लायपास्टमध्ये सहभागी होणार आहे. एकूण ५६ विमाने सहभाग घेतील. त्यात १९ हेलिकॉप्टर्स आणि सात मालवाहतूक करणारी विमाने आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 2:13 pm

Web Title: indian air force is prepared for two front war iaf chief rks bhadauria dmp 82
Next Stories
1 हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांचा दावा
2 तामिळनाडूतील लोकांना रेल्वेचे SMS हिंदीत कशासाठी?, DMK चा रेल्वे मंत्रालयाला प्रश्न
3 JEE Advanced 2020 Result – पुण्याचा चिराग फलोर देशात अव्वल
Just Now!
X