News Flash

VIDEO …आणि भारतीय सैन्यापासून जीव वाचवून पळाले दहशतवादी

भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावल्याचा एका व्हिडिओ जारी केला आहे.

नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून हे प्रमाण वाढले आहे. घुसखोरांच्या मदतीसाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचेही उल्लंघन केले जाते. सीमेवर सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी आतापर्यंत पाकिस्तानचे घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत.

भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावल्याचा एका व्हिडिओ जारी केला आहे. ३० जुलैचा हा व्हिडिओ आहे. काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या निदर्शनास आले. भारतीय सैन्याने लगेचच दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला आणि त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले.

भारतीय सैन्य चौक्यांवर हल्ला करण्यासाठी हे दहशतवादी येत होते. भारतीय सैन्याकडून गोळीबार सुरु होताच जीव वाचवण्यासाठी या दहशतवाद्यांनी पळ काढला. पाकिस्तान भारतात घातपात घडवण्यासाठी वेगवेगळे कट रचत आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानने ड्रोनद्वारे मोठया प्रमाणावर शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 5:21 pm

Web Title: indian army forced to terrorist to return to their territory dmp 82
Next Stories
1 MP Sex Scandal: कॉलेज कुमारींना व्हिआयपींबरोबर सेक्स करण्यास पाडलं भाग; मुख्य आरोपीची कबुली
2 चीन मधल्या मुस्लिमांच्या स्थितीबद्दल इम्रान खान यांचे मौन का? अमेरिकेचा सवाल
3 राजस्थान : जोधपुरमध्ये भीषण अपघात १३ जणांचा मृत्यू , १० जण जखमी
Just Now!
X