अमेरिकेतील शिक्षण संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत आह़े  अशा भारतीयांच्या यादीत आता डॉ़  विस्तास्प एम़  कारभारी या संरचनात्मक अभियंत्याचा समावेश झाला आह़े  नुकतीच १२ मार्च रोजी अर्लिग्टॉन येथील टेक्सास विद्यापीठाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आह़े  जून पासून पदभार स्वीकारतील आहेत़
डॉ़  विस्तास्प यांनी आपले उच्च शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केल़े  सध्या ते हंट्स विल्ले येथील अलाबामा  विद्यापीठात शैक्षणिक कामकाज विभागाचे उप कार्यकारी अध्यक्ष आहेत़  टेक्सास विद्यापीठ हे अत्युत्तम विद्यापीठ आह़े  संशोधन आणि शिक्षण यांत विद्यापीठाची उत्कृष्टता अबाधित राखत आणि वाढवत मला या विद्यापीठाला प्रथम श्रेणीच्या दर्जापर्यंत घेऊन जायचे आह़े  त्याच वेळी आमच्या विद्यार्थ्यांच्या यशाचीही ग्वाही द्यायची आहे, असे डॉ़  विस्तास्प यांनी आपल्या निवडीबद्दल बोलताना सांगितल़े  या पूर्वी डॉ़  विस्तास्प यांनी कॉलिफोर्निया- सॅन डिएगो विद्यापीठाच्या संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाच्या उपाध्यक्ष आणि प्राध्यापक पदावर काम केले आह़े