देश डिजीटल होऊ लागला आहे. नोटाबंदीनंतरच्या काळात अनेकांनी डिजीटल व्यवहारांना प्राधान्य दिलंय. डिजीटल व्यवहार वाढले आहेत. सरकारही डिजीटल व्यवहारांना प्राधान्य आहे. असं असताना मात्र देशाचे सायबर सुरक्षा प्रमुख गुलशन राय मात्र नेट बँकिंगपासून चार हात लांबच राहणं पसंत करत आहे. एका कार्यक्रमात आपण शक्यतो नेट बँकिंग करणं टाळतो याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.

‘मी माझ्या खात्यात २५ हजार रुपये ठेवतो आणि डेबिट कार्डच्या मार्फत व्यवहार करतो. जेणेकरून मला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे जावं लागणार नाही’ असं राय म्हणाले. माझं बँकेत वेगळं खातं आहे. त्या खात्यात मी दरवेळी थोडी पुंजी ठेवतो असंही राय यावेळी म्हणाले.

नेट बँकिंगमध्ये काही त्रुटी आहेत त्यामुळे मी शक्यतो नेट बँकिंग करणं टाळतो असं मत त्यांनी मांडलं. एटीएम, क्रेडिट कार्डांचे घोटाळे खूप किचकट आहेत, ते सोडवणंही कठीण आहे. डिजीटल व्यवहारांमध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या सोडवणं मोठं आव्हान आहे असंही राय यांनी कार्यक्रमात सांगितलं.