28 February 2020

News Flash

इंजिन बदल न केल्यास  इंडिगोला  उड्डाण परवानगी नाही

नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी इंडिगोला दिला आहे.

नवी दिल्ली : ए ३२० निओ ९७ विमानांच्या दोन्ही पंखांखालील प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी (पीडब्ल्यू) इंजिन कोणत्याही स्थितीत ३१ जानेवारीपर्यंत बदलण्यात यावीत अन्यथा या विमानांच्या उड्डाणाला परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी इंडिगोला दिला आहे. विस्कटलेली घडी बसविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची गरज असल्याचेही डीजीसीएने स्पष्ट केले.

या ९७ विमानांपैकी २३ विमानांमध्ये पीडब्ल्यू इंजिन आहेत आणि त्यांचा २९०० तासांहून अधिक वापर झाला आहे त्यामुळे १९ नोव्हेंबपर्यंत पहिल्या टप्प्यात ती बदलावी, असेही डीजीसीएने इंडिगोला सांगितले आहे. गेल्या एका आठवडय़ात ए३२० निओ विमानांच्या इंजिनात उड्डाण करताना बिघाड निर्माण झाल्याचे  प्रकार घडले होते त्या पाश्र्वभूमीवर डीजीसीएने वरील आदेश दिले आहेत.

ए ३२० निओ १६ विमानांमध्ये असलेली पीडब्ल्यू इंजिन १२ नोव्हेंबपर्यंत बदलण्याचे आदेश डीजीसीएने सोमवारी दिले होते, मात्र आणखी सात विमानांचेही त्याच इंजिनाने उड्डाण होत असल्याचे निदर्शनास आले. या २३ विमानांमध्ये (१९ नोव्हेंबरनंतर) किमान एक तरी लो प्रेशर टर्बाइन (एलपीटी) इंजिन नसल्याचे आढळले तर त्यापैकी एकाही विमानाला व्यावसायिक दृष्टिकोनातून उड्डाणाची परवानगी दिली जाणार नाही, या बाबीची पूर्तता होईपर्यंत वेळापत्रकात कपात केली जाईल, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

First Published on November 2, 2019 12:01 am

Web Title: indigo flight is not allowed unless engine changes zws 70
Next Stories
1 शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसचा ‘अद्याप’ निर्णय नाही!
2 भारतातील व्यवसायाबाबत व्होडाफोन इंडियाने स्पष्ट केली भूमिका
3 काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार? महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या निवासस्थानी
Just Now!
X