27 February 2021

News Flash

जम्मू काश्मीर हाय अलर्टवर, २० दहशतवाद्यांची घुसखोरी; हल्ल्याची शक्यता

घुसखोरी करणारे दहशतवादी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे असल्याचं समजत आहे

नियंत्रण रेषा पार करत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली असून जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानव्याप्त काश्मीमधून जवळपास २० दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे.

घुसखोरी करणारे दहशतवादी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे असल्याचं समजत आहे. दहशतवादी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. खासकरुन काश्मीर खोऱ्याला लक्ष केलं जाण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं असून राज्यातील संवेदनशील भागांमध्ये पहारा ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरुनच पाकिस्तानात बसलेले हॅण्डलर्स काश्मीरमध्ये हिंसा घडत राहावी यासाठी किती प्रयत्न करत आहेत हे दिसत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:03 pm

Web Title: infiltration of terrorists in the valley puts security forces on high alert
Next Stories
1 सलमान खानला मारहाण करणाऱ्याला दोन लाखांचं बक्षीस
2 रिक्षा चालकाने १७ वर्षाच्या मुलीला घरी नेऊन केला बलात्कार
3 सीता हे टेस्ट ट्यूब बेबीचे अपत्य; भाजपा नेत्याची मुक्ताफळे
Just Now!
X