23 September 2020

News Flash

‘याकूबच्या अंत्ययात्रेत आलेल्यांवर नजर ठेवा’

याकूब मेमनच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. भविष्यात त्यातले काही जण दहशतवाद घडवून आणू शकतात, असे धक्कादायक ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत

| July 31, 2015 04:52 am

याकूब मेमनच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. भविष्यात त्यातले काही जण दहशतवाद घडवून आणू शकतात, असे धक्कादायक ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे. याकूबच्या अंत्ययात्रेत कुटुंबिय आणि मित्रपरिवाराव्यतिरीक्त सहभागी झालेल्या लोकांवर गुप्तचर यंत्रणेने नजर ठेवावी. त्यातील काही जण भविष्यात दहशतवादाकडे ओढले जाऊ शकतात. त्यांच्यावर नजर ठेवणे हे दहशतवादाला रोखण्याचाच एक भाग आहे, असेही तथागत रॉय म्हणाले आहेत. दरम्यान, रॉय यांच्या ट्विटवर टीकेची राळ उठवली जात आहे. रॉय जातीयवाद निर्माण करण्याचे काम करीत असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर रॉय यांनी उत्तरादाखल पुढील ट्विटमध्ये म्हटले की, मी माझ्या ट्विटमध्ये कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल बोललेलो नाही. त्यामुळे मी जातीयवादी आहे, असा आरोप कसा काय केला जाऊ शकतो?, असा सवाल रॉय यांनी उपस्थित केला. जनहिताशी संबंधित एखादी बाब नजरेस आणून देणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. असे करून राज्यपालपदाच्या कोणत्याही मर्यादा ओलांडलेल्या नसल्याचेही रॉय पुढे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 4:52 am

Web Title: intelligence should keep a tab on all who assembled bfr yakub memon corpse says tathagata roy
टॅग Yakub Memon
Next Stories
1 हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यामुळे दहशतवाद विरोधी लढा कमकुवत – राजनाथ सिंह
2 मुलाचा मृतदेह असलेली बॅग घेऊन तिने खरेदी केली…
3 ‘बजरंगी भाईजान’ पाहण्यासाठी पाकिस्तानात प्रेक्षकांची गर्दी
Just Now!
X