08 March 2021

News Flash

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामसूत्र पुस्तकाची पवित्र आवृत्ती आणणार’

माजी आयपीएस संजीव भट्ट यांच्या ट्विटमुळे नेटिझन्सची टीका सुरू

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मनुस्मृतीप्रमाणे कामसूत्र या पुस्तकाची नवी आवृत्ती घेऊन येणार आहे. या पुस्तकाचं नाव ‘काऊमसूत्र’ असेल असं ऐकिवात आहे हे ट्विट केलं आहे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी. कामसूत्र हे प्राचीन भारताची परंपरा सांगणारं,  स्त्री आणि पुरूष यांच्यातल्या शरीर संबंधांचं वर्णन करणारं पुस्तक आहे. वात्सायन या ऋषींनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे, हे पुस्तक एखाद्या सेक्स गाईडप्रमाणे वापरलं जातं.

 

 

मात्र संजीव भट्ट यांनी याच पुस्तकाचा आधार घेत मनुस्मृतीप्रमाणे आता संघी लोक कामसुत्राचीही पवित्र आवृत्ती घेऊन येणार आहेत आणि लोक त्याला ‘काऊमसूत्र’ असं म्हणतील असं ट्विट केलं आहे. देशभरात सध्या गोरक्षेचा मुद्दा गाजतो आहे अशात आता माजी आयपीएस अधिकारी यांनी हाच मुद्दा थेट कामसुत्रासोबत जोडला आहे, त्यांचा हा ट्विट वाद निर्माण करणार यात शंकाच नाहीये. हा ट्विट केल्यानंतर संजीव भट्ट यांच्यावर नेटिझन्सनी टीका करायला सुरूवात केली आहे. सॉरी डिअर तुला कामसुत्रापेक्षा घाणेरडा शब्द सापडला नाही का? असा प्रश्न गोपाळ नावाच्या युझरनं विचारला आहे. तुमच्यासारखे सणकी लोक आपल्या महान देशासोबत काय खेळ करू इच्छितात हे माहिती नाही अशीही प्रतिक्रिया एका युझरनं दिली आहे. तुम्ही कोणत्या जगात वावरत आहात मिस्टर भट्ट या सत्ताधाऱ्यांनी तर आधीच काऊमसूत्रची निर्मिती केली आहे अशीही खोचक टीका आणखी एका युझरनं केली आहे.

संजीव भट्ट यांनी ट्विट टाकल्यावर आता विविध प्रकारच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. या ट्विटमुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हंही नाकारता येत नाहीत. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच ट्विटद्वारे निशाणा साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित गोरक्षकांनी देशात धुमाकूळ घातला आहे. गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरूनही मारहाणीचे प्रकार होत आहेत यामध्ये लोकांचा जीव जातो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनांचा निषेध केला आहे मात्र या सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी कथित गोरक्षकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. अशात आता संजीव भट्ट या माजी अधिकाऱ्याचा ट्विट सत्ताधाऱ्यांना आणि संघ कार्यकर्त्याांना झोंबणार हे निश्चित.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 11:27 pm

Web Title: ips sanjiv bhatt syas like manusmriti rss bringing sanitized version kamasutra
Next Stories
1 ‘सीबीआय पोपटाप्रमाणे नाही तर कुत्र्याप्रमाणे काम करतं’
2 मी घडलो ते फक्त संसदेमुळेच-प्रणव मुखर्जी
3 रशिया भारताला देणार अत्याधुनिक लढाऊ विमान?
Just Now!
X