News Flash

पाकिस्तानला झटका, इराणने केला ‘सर्जिकल स्ट्राइक’

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर....

इराणने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. इराणने पाकिस्तानात घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश अशी पाकिस्तानची ओळख आहे. त्यामुळेच यापूर्वी भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केले होते. अमेरिकेने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता, तर भारताने उरी सैन्य तळावरील हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली होती, यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

इराणने पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करुन कैदेत असलेल्या आपल्या सैनिकांची सुटका केली. इराणने या आठवड्यात हा सर्जिकल स्ट्राइक केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड या एलिट फोर्सने गुप्तचर माहितीच्या आधारावर पाकिस्तानात हे ऑपरेशन करुन, आपल्या दोन सैनिकांची सुटका केली. रिव्होल्युशनरी गार्डसने ही माहिती दिली आहे. मंगळवारी रात्री केलेल्या या यशस्वी ऑपरेशनमध्ये दोन सैनिकांची सुटका केली असे आयआरजीसीकडून सांगण्यात आले.

जैश-उल-अदल या दहशतवादी संघटनेने अडीचवर्षांपूर्वी इराणच्या दोन सैनिकांचे अपहरण करुन त्यांना बंधक बनवले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑपरेशन करुन त्यांची सुटका केली.

पाकिस्तानातील वाहाबी दहशतवादी संघटना जैश-उल-अदलने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी इराण-पाकिस्तान सीमेवरुन १२ आयआरजीसीच्या सैनिकांचे अपहरण केले होते. या सैनिकांच्या सुटकेसाठी इराण आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी समिती बनवली होती.

१५ नोव्हेंबर २०१८ ला पाच सैनिकांची सुटका करण्यात आली. २१ मार्च २०१९ ला पाकिस्तानी लष्कराने चार इराणी सैनिकांची सुटका केली. इराणने जैश-उल-अदलला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. इराणमध्ये राहणाऱ्या बलोच सुन्नींच्या अधिकारांच्या रक्षणासाठी जैश-उल-अदलच्या इराण सरकारविरोधात कारवाया सुरु असतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 7:42 pm

Web Title: iran conducts surgical strike in pakistan dmp 82
Next Stories
1 ‘ओम फट् स्वाहा’चा दरारा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन
2 “मोदींनी अमेरिकन संसदेवरील हल्ल्यासंदर्भात भाष्य का केलं?, भारत सरकार नेपाळ, श्रीलंकेच्या अंतर्गत विषयांवर का बोलतं?”
3 FIR दाखल झाल्याच्या त्या बातमीनंतर ग्रेटा थनबर्ग म्हणाली….
Just Now!
X