अमेरिका आणि इरान यांच्यातील तणाव सध्या वाढला असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज इरानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डनी अमेरिकी ड्रोन गोळी मारून पाडले आहे. तर अमेरिकेने मात्र या वृत्तावर कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

एपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरक्यू-४ ग्लोबल हॉक ड्रोन पाडण्यात आले आहे. या अगोदर अमेरिकी सेनेने ओमान खाडीमध्ये १३ जून रोजी तेलाच्या दोन टँकर्सवर हल्ला केल्याचा इराणवर आरोप केला होता. मात्र इरानकडू हे आरोप फेटाळण्यात आले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागिल वर्षी अणवस्त्र करारामधुन अमेरिकेला वेगळे केले होते व इरान वर उर्जा आणि आर्थिक निर्बंध लादले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.