रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या नाष्टा आणि जेवणाच्या दरांमध्ये रेल्वे मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत. याबाबतच्या नव्या मेन्यूचे आणि दरांचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सुधारित दरांनुसार, प्रवाशांना नाष्टा आणि जेवणासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दि इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टुरिझमने अर्थात ‘आयआरसीटीसी’ने हे स्पष्ट केले आहे.

रेल्वेच्या परिपत्रकानुसार, जेवणाचे जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते जीएसटी करांसहित असणार आहेत. रेल्वेचे ठराविक खाद्यपदार्थ, जनता मिलसारख्या जेवणाचे मेन्यू आणि त्यांच्या दरांची मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे. याच सूचना रेल्वे स्थानकांवरील रिफ्रेशमेंट रुम, जनआहार सारख्या युनिट्ससाठीही लागू असतील.

जेवणाच्या दरांमध्ये वाढ केल्याने जेवणाची गुणवत्ता आणि आरोग्यपूर्ण जेवणामध्ये सुधारणा दिसून येईल, अशी खात्री आयआरसीटीसी आणि विभागीय रेल्वे कार्यालयाने व्यक्त केली आहे. निश्चित केलेले हे ध्येय गाठण्यासाठी रेल्वेकडून याची सातत्याने पडताळणी देखील केली जाणार आहे.

नव्या दरांनुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांच्या एसी फर्स्ट, एसी सेकन्ड, एसी थर्ड डब्यांसाठी अनुक्रमे नाष्ट्यासाठी १४० रुपये आणि १०५ रुपये इतका दर असणार आहे. तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी २४५ रुपये एसी फर्स्टसाठी तर १८५ रुपये एसी सेकन्ड आणि थर्डसाठी द्यावे लागणार आहेत. तसेच संध्याकाळचा चहा एसी फर्स्टसाठी १४० रुपये आणि एसी सेकन्ड आणि थर्डसाठी ९० रुपये इतका असणार आहे. तर, दुरान्तो गाड्यांधून स्लीपर क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाष्ट्यासाठी ६५ रुपये, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी १२० रुपये तर संध्याकाळच्या चहासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ‘लाइव्ह मिंट’ या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

एक्स्प्रेस, मेल गाड्यांसाठी बदललेले नवे दर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • व्हेज नाष्टा – ₹३५
  • नॉन-व्हेज नाष्टा – ₹४५
  • साधारण व्हेज जेवण – ₹७०
  • साधारण व्हेज जेवण (अंडा करी) – ₹८०
  • साधारण व्हेज जेवण (चिकन करी) – ₹१२०
  • व्हेज बिर्याणी (३५० ग्रॅम) – ₹७०
  • अंडा बिर्याणी (३५० ग्रॅम) – ₹८०
  • चिकन बिर्याणी (३५० ग्रॅम) – ₹१००
  • स्नॅक मील (३५० ग्रॅम) – ₹५०