News Flash

इस्त्रायलची भारताला खंबीर साथ! बिनशर्त लागेल ती मदत करायला तयार

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचं म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचं म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात युद्धज्वराचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई करावी असा जनसामान्यांमध्ये मतप्रवाह आहे. जेरुसलेम भारताला कितपत मदत करु शकतो या प्रश्नावर डॉ. रॉन मल्का यांनी हे उत्तर दिले. मागच्या आठवडयात पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काश्मीरमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यामुळे देशात पाकिस्तानबद्दल प्रचंड रोष आहे.

भारताने सुद्धा इस्त्रायल सारखे धोरण अवलंबून कारवाई करावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे. इस्त्रायल दहशतवादाविरुद्ध कठोर आणि वेगवान कारवाईसाठी ओळखला जातो. भारताला आपल्या संरक्षणासाठी जी काही गरज लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या जवळच्या मित्राला लागेल ती मदत करु. दहशतवाद ही फक्त भारत आणि इस्त्रायलची नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या आहे असे मल्का यांनी सांगितले.

५२ वर्षीय मल्का इस्त्रायली लष्करात होते. कर्नल पदावर असताना ते लष्करातून निवृत्त झाले. भारत इस्त्रायलचा महत्वाचा सहकारी आणि जवळचा मित्र असल्याचे आपल्याला पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितल्याचे मल्का म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 4:57 pm

Web Title: israel offers unconditional help to india
Next Stories
1 सिद्धूजी आपले मित्र इम्रान खान यांना जरा समजवा, दिग्विजय सिंह यांचा सल्ला
2 कमल हसन, नसरुद्दीन शाहसारखे लोक गजवा-ए-हिंदचे एजंट : गिरीराज सिंह
3 ‘जाणत्या राजा’चा अमेरिकेतही जयजयकार… परदेशात अशी साजरी झाली शिवजयंती
Just Now!
X