News Flash

इस्रोच्या दिशादर्शन उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर

आयआरएनएसएस १ डी या भारताच्या चौथ्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण ९ मार्चला होणार होते, परंतु ते तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आले आहे.

| March 5, 2015 12:30 pm

आयआरएनएसएस १ डी या भारताच्या  चौथ्या दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण ९ मार्चला होणार होते, परंतु ते तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आले आहे.
 उपग्रहाच्या दूरसंदेशवहन ट्रान्समीटरमध्ये दोष आढळून आल्याने उड्डाण लांबणीवर टाकण्यात आल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे. पीएसएलव्ही सी २७ या प्रक्षेपकाने हा उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोडण्यात येणार आहे.
इस्रोने फेसबुक पेजवर म्हटले आहे की, उपग्रहाची तपासणी करण्यात आली असता त्याच्या ट्रान्समीटरमध्ये बिघाड दिसून आला. आता पुढील तपासणीसाठी या उपग्रहाचे उड्डाण लांबणीवर टाकले आहे. नवीन तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या उपग्रहामुळे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीममध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करणार आहे. आयआरएनएसएस १ डी हा इस्रोच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीतील चौथा उपग्रह आहे. इंडियन रिजनल नॅव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टीम असे या प्रणालीचे नाव आहे. दिशादर्शन प्रणाली चालवण्यासाठी चार उपग्रह पुरेसे असून त्यामुळे अचूकतेने स्थाननिश्चिती करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:30 pm

Web Title: isro postpones march 9 launch of fourth irnss satellite
टॅग : Isro
Next Stories
1 ‘आप’मध्ये शिमगा
2 अण्वस्त्रधारी इराण जगासाठी धोका
3 मुंबईवरील हल्ल्यातील एकाचीच साक्ष
Just Now!
X