इस्रोने पाठवलेल्या मंगळयानाने पृथ्वीचे पहिले छायाचित्र काढले असून, त्यात आंध्र प्रदेशकडे झेपावणाऱ्या हेलेन हे चक्रीवादळ स्पष्ट दिसत आहे. मंगळयानाने पाठवलेल्या या छायाचित्रामध्ये भारतीय उपखंड आणि आफ्रिकेचा काही भाग दिसत होता. हेलन चक्रीवादळ शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, असे या छायाचित्राचा अभ्यास करून इस्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितले.
मंगळयानात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याने ६७,९७५ किलोमीटर अंतरावरून मंगळवारी दुपारी १.५० वाजता हे छायाचित्र टिपले आहे. इस्रोच्या संकेतस्थावर हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली.