19 January 2018

News Flash

जीएसटीत बदल झाल्यामुळे देशात दिवाळीसारखे वातावरण- मोदी

२७ वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत.

गुजरात | Updated: October 7, 2017 3:09 PM

PM Narendra Modi in Gujrat : जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे आश्वासन आम्ही यापूर्वीच दिले होते. जेणेकरून कायद्यातील त्रुटी दूर करता येतील. अखेर काल जीएसटी समितीने हे बदल करून सामान्यांना दिलासा दिला, असे मोदींनी सांगितले.

वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत केंद्र सरकारकडून काल महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यामुळे देशात १५ दिवस आधीच दिवाळी आली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते शनिवारी गुजरातमधील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मोदींनी जीएसटी कायद्यात करण्यात आलेल्या बदलांचा दाखला देताना सांगितले की, आज देशातील अनेक वृत्तपत्रांच्या मथळ्यात देशात १५ दिवस आधीच दिवाळीचे आगमन झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातील लोक आनंदित झाले आहेत. जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे आश्वासन आम्ही यापूर्वीच दिले होते. जेणेकरून कायद्यातील त्रुटी दूर करता येतील. अखेर काल जीएसटी समितीने हे बदल करून सामान्यांना दिलासा दिला, असे मोदींनी सांगितले.

तसेच देशातील लोक सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देत असल्याचा दावाही त्यांनी केला. जेव्हा लोकांचा सरकारवर विश्वास असतो आणि चांगल्या हेतूने एखादा निर्णय घेतला जातो, तेव्हा लोकांनी त्याला पाठिंबा देणे नैसर्गिक आहे. सध्या देशातील सामान्य जनतेला विकासाचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा, असे वाटते. कोणालाही त्यांच्या मुलांनी गरीबीत आयुष्य काढावे, असे वाटत नाही. त्यामुळे अशा लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना गरिबीशी लढा देण्यासाठी सरकार मदत करेल, असे आश्वासन मोदींनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. आज द्वारकाधीश मंदिरात पुजा केल्यानंतर ओखा आणि द्वारकाला जोडणाऱ्या पुलाचे मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. तसेच जीएसटीची व्यवस्थित अंमलबजावणीही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, मोदींनी हे सर्व आरोप फेटाळून लावत देश प्रगतीपथावर असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी सर्वसामान्यांना दिलासा देत सुमारे २७ वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. यामुळे कपडे, आयुर्वेदिक औषधे स्वस्त होणार असून वातानुकूलित हॉटेलमधील जीएसटी १८ टक्क्यांऐवजी १२ टक्क्यांवर आला आहे. जीएसटीत सध्या ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे असून या चार टप्प्यांमध्ये येणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करण्याची मागणी होत होती. याशिवाय निर्यातदारांच्या समस्यांवरही तोडगा काढण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. आयुर्वेदिक औषधांवर १२ टक्के कर होता. मात्र यापुढे आयुर्वेदिक औषधांवर ५ टक्के कर असेल. याशिवाय खाकरा, चपाती, नमकीन पदार्थांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. याशिवाय पोस्टर कलरसह अनेक शालेय उपयोगी साहित्यांवर २८ ऐवजी १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. प्लास्टिक वेस्ट, रबर वेस्ट आणि पेपर वेस्टवर पाच टक्के कर आकारण्यात येईल. तर आयजीएसटी (इंटरस्टेट) करिता निर्यातदारांना सहा महिन्यांचा दिलासा देण्यात आला. निर्यातदारांसाठी एप्रिल २०१८ पासून ई-वॅलेट सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही जेटलींनी केली. हातमागावर यापूर्वी १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता, तो आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

First Published on October 7, 2017 1:22 pm

Web Title: it was like diwali yesterday when we made some important changes in the goods and services tax pm narendra modi in gujrat
 1. A
  Awate
  Oct 8, 2017 at 10:34 am
  एका हाताने ओरबाडतो आणि दुसर्या हाताने देण्याचे नाटक करणारा दळभद्री प्रधानशोशक
  Reply
  1. S
   shrikant
   Oct 7, 2017 at 10:00 pm
   काहीतरी गल्लत होतेय.. नीट बघा ..ते दिवाळी म्हणाले कि दिवाळं म्हणाले ?
   Reply
   1. Ramdas Bhamare
    Oct 7, 2017 at 5:03 pm
    एकाद्या खंडणीखोराने कमी खंडणी वसूलण्याचे ठरविणे आणि त्यामुळे जनता आनंदी झाल्याचा दावा करणे , एखाद्याला कमी त्रास देणे म्हणजे त्याला दिवाळीची भेटवस्तू दिली असे म्हणणे जसे हास्यास्पद ठरेल तसेच मोदींचे वक्तव्य आहे . काल एका बिकाऊ हिंदी वाहिनीवर " १३० करोड हिन्दुस्तानीयों को मोदी का दिवाली तोहफा " अशी हेडलाईन दाखवली जात होती .
    Reply
    1. K
     Ketan
     Oct 7, 2017 at 5:02 pm
     गुजरात निवडणुका आणि लोक्कांचा वाढत जाणणारा रोष यामुळे तुम्हाला माघार ग्यावी लागी आहे हे सत्य आहे ....तुम्हाला घ्यावी लागलेली माघार हि तुमची नामुष्की आहे. त्याचे sherya कसले घेताय ? इव्हेंट काय साजरे करताय ? लोकांना किती उल्लू बनवणार ? (तसेही फक्त भक्त उल्लू बनतात , शांतपणे विचार करणाऱ्या सामान्य माण हि सर्व नौटंकी कळते) सत्तेसाठी हपापलेले प्रधान सेवक......पदाची शोभा घालवली .....
     Reply
     1. V
      vivek
      Oct 7, 2017 at 4:20 pm
      आई शप्पत इतका मोठा थापाड्या बघितला नाही
      Reply
      1. Y
       Yogesh
       Oct 7, 2017 at 3:53 pm
       गुजरात निवडणुकीत पराभवासमोर दिसूलागला मानून डोळे उघडले वाटते यांचे GST कमी करून मत मागाल याला आणि जिंकल्यावर पुन्हा GST वाढवाल असेल घाणेरडे लोक आहात तुम्ही
       Reply
       1. M
        Milind Warik
        Oct 7, 2017 at 3:52 pm
        Chal hat !! Zoote kahi ke..
        Reply
        1. H
         hemantkumarmohan
         Oct 7, 2017 at 3:42 pm
         वाढविले पण तुम्हीच होते मोदीजी...मग स्वतःचा निर्णय मागे घ्यावा लागल्याबद्द्ल एवढा आनंद कसला???
         Reply
         1. D
          deshpremi
          Oct 7, 2017 at 3:28 pm
          ८० रुपये लिटर पेट्रोल आणि ६१ रुपये लिटर डिझेल घेऊन कोणाला दिवाळी आहे असे वाटेल ...
          Reply
          1. V
           Vinay
           Oct 7, 2017 at 3:11 pm
           खूप उशीर झाला. शेवटी ह्या देशातले लोक परमेश्वरावर भरवसा का ठेवतात ह्याचा उत्तर अजून एकदा मिळालं. आपल्या सेवेबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा.
           Reply
           1. S
            satya
            Oct 7, 2017 at 3:10 pm
            Bad joke. Stop making mockery of citizens.
            Reply
            1. सुहास
             Oct 7, 2017 at 2:53 pm
             च्यायला, ह्याला कुठं दिसतयं दिवाळीसारखं वातावरण.... अरे फेकणार म्हणजे किती फेकणार? तिकडं चीन डोके वर काढतोय, पेट्रोलवर भरमसाठ कर लादून सरकार जनतेचा खिसा रिकामा करतयं. यंदा इकडे फराळाचे पदार्थ यंदा होणार नाहीत, कंपनीतील मालक लोक म्हणतायेत, थंदा नाय तुम्हांला बोनस कुठनं द्यायचा? बोनस नाय तर कसलं नवं कपडं कसली दिवाळी. आरं देशात शिमग्याचं वातावरण हाय. काय पेटवू सांग.
             Reply
             1. K
              kailas
              Oct 7, 2017 at 2:11 pm
              अहो महाशय, नोटाबंदीमुळे मेलेली १२५ माणसे, कित्येक लाख कोटींचा चुराडा, हातच्या गेलेल्या १० कोटी नोकऱ्या, चुकीच्या जीएसटीमुळे झालेले कोट्यवधींचे नुकसान आणि आपण पंतप्रधान झाल्यापासून यशस्वी न झालेली एकही योजना याबद्दल गेली तीन वर्षे जनता खोल अंधारात बुडून गेली त्याचे काय? तुमचे दिवस भरलेत महाशय आता. मनमोहनसिंग यांची नक्कल करणे सोपे पण त्यांची अक्कल मिळवणे किती कठीण असते, हे तुम्हाला नसेल कळले पण जनतेला कळले आहे. तुमचे अडीच लोकांचे हुकूमशाही सरकार २०१९ मध्ये कोसळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. थोडे दिवस थांबा जाहीर कार्यक्रमांमध्ये अंडी आणि टोमॅटो खाण्याची तयारी ठेवा तुम्ही. फेकणारा माणूस कुठला..
              Reply
              1. Surendra Belkonikar
               Oct 7, 2017 at 1:40 pm
               स्वतःभोवती आरती स्वतःच ओवाळा....जनतेने कौतुक करावे!
               Reply
               1. Load More Comments