अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का ट्रम्प यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आज हैदराबादमध्ये झाली. हैदराबादमध्ये होणाऱ्या आंत्रप्रेन्युअरशिप परिषदेत सहभागी होण्यासाठी त्या आल्या आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही इव्हान्का ट्रम्प भेटल्या. दोघींमध्ये महिला सक्षमीकरणावर चर्चा झाली.

जीइएस संमेलन २०१७ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. याच संमेलनात इव्हान्का ट्रम्प सहभागी झाल्या असून त्यांनी थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहेत. इव्हान्कांसोबत अमेरिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळही उपस्थित आहे. हैदराबादमध्ये हे संमेलन रंगले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांचीही इव्हान्का ट्रम्प यांनी भेट घेतली. के. सी. राव यांच्योसबत इव्हान्का आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादच्या संमेलनातील वैविध्यपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच अनोखे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.