08 July 2020

News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये ‘हिज्बुल’च्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान

परिसरात शोधमोहीम सुरू

पुलवामामधील तहाब येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. परिसरात आणखी एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी घेरल्याचे वृत्त असून अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते.

पुलवामामधील तहाब परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. रविवारी सकाळी पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. या दरम्यान दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधीत होते अशी माहिती समोर येत आहे. या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. या भागात आणखी एक दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी घेरल्याचे वृत्त आहे. परिसरात चकमक सुरु आहे.

दरम्यान, या वर्षी १६ जुलैपर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये १०४ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केल्याची माहिती केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी संसदेत दिली होती. गेल्यावर्षी काश्मीरमध्ये १५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. जम्मू काश्मीरमधील काही ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिज्बुल मुजाहिद्दीनने घेतल्याची माहितीही सरकारने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 11:17 am

Web Title: jammu and kashmir 2 terrorists killed in pulwama encounter search operation underway in tahab area
Next Stories
1 विमानात स्फोट घडवण्याचा कट उधळला, सिडनीत चौघांना अटक
2 अमित शहांचे ‘मिशन उत्तर प्रदेश’; समाजवादी, बसपच्या मतांवर डोळा
3 भाजपच्या सत्तालालसेमुळे लोकशाही धोक्यात – मायावती
Just Now!
X