01 March 2021

News Flash

जम्मू-काश्मीर: घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक

हे तिघेही भारताचे रहिवासी असून दहशतवादी प्रशिक्षणासाठी ते पाकिस्तानात गेले होते, असे सांगण्यात येते.

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. कुपवाडा येथील करनाह येथे घुसखोरी करत भारतीय सीमेत येण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी लष्कराने त्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराने प्रारंभी चौकशी केल्यानंतर तिनही दहशतवाद्यांना पोलिसांच्या हवाली केले. या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांकडून मोठ्याप्रमाणात हत्यारे, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. हे तिघेही भारताचे रहिवासी असून दहशतवादी प्रशिक्षणासाठी ते पाकिस्तानात गेले होते, असे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 11:20 pm

Web Title: jammu and kashmir 3 terrorists arrested in karnah of kupwara district by army while they were infiltrating on the borders
Next Stories
1 राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडा, तामिळनाडू सरकारची शिफारस
2 वसुंधरा राजेंची राजकीय खेळी, पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये ४ टक्क्यांची कपात
3 ‘अजेय भारत, अटल भाजपा’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवीन घोषणा
Just Now!
X