01 March 2021

News Flash

जम्मू- काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान

अनंतनागमधील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. तर आणखी तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असून घटनास्थळी अजूनही चकमक सुरु आहे.

अनंतनागमधील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान घरात लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. घरात आणखी तीन दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

मृत दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आली असून तो मूळचा पाकिस्तानचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो जैश – ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 11:07 am

Web Title: jammu and kashmir encounter between security forces and terrorists anantnags kokernag
Next Stories
1 भारतातील जिहादसाठी पाकमध्ये ‘जैश’चे दहशतवादी गोळा करतायंत पैसे
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 आयएएस अधिकाऱ्याच्या पणतूलाही मागासवर्गीय समजणार का? : सुप्रीम कोर्ट
Just Now!
X