25 November 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : टोल नाक्यावरील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

ट्रकमधून आले होते दहशतवादी, टोल नाक्यावर झाली जोरदार चकमक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांचे अभियान सुरू आहे. आज पहाटे पाच वाजता नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. ज्यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय, जवानांकडून सर्व वाहनांची तपासणी देखील केली जात आहे.

दरम्यान गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी नगरोटा भागात जागोजागी बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची तपासणी केली जात असतानाच, ट्रकमधून आलेले दहशतवादी जंगलाकडे पळू लागले. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

या चकमकीत चार दहशतवादी ठार केले गेले. नंतर जम्मू-श्रीनगर महामार्ग देखील बंद करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार हे दहशतवादी ट्रकद्वारे जम्मू-श्रीनगर मार्गाने काश्मीरला जात होते. याच दरम्यान टोल नाक्यावर सुरू असलेली वाहनांची तपासणी पाहून ते जंगलात पळ काढत असतानाच, चकमक सुरू झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 8:49 am

Web Title: jammu and kashmir four terrorists killed in clashes in nagarota msr 87
Next Stories
1 ‘गुपकार गँग’वरून फारूख अब्दुल्लांचा अमित शाहंवर निशाणा, म्हणाले “माझा इतिहास…”
2 पूर्व लडाख सीमेवर सैनिकांसाठी सुविधायुक्त निवाऱ्याची व्यवस्था
3 येडीयुरप्पांकडून अजित पवार यांचा निषेध
Just Now!
X