News Flash

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावादी नेता यासिन मलिक ताब्यात

आगामी काळात आणखी काही फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम ३५ अ या कलमाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देणार असतानाच या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ताब्यात घेतले.

१४ मे १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी एक आदेश पारित केला होता. या आदेशान्वये भारताच्या संविधानात एक नवीन कलम ३५ (अ) जोडण्यात आले. कलम ३५ अ, कलम ३७० चाच हिस्सा आहे. कलम ३५ अ नुसार, जम्मू-काश्मीरमधील नागरिक तेव्हाच राज्याचा हिस्सा मानला जाईल जेव्हा त्याचा जन्म त्या राज्यातच होईल. इतर राज्यातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकत नाही किंवा तेथील नागरिक बनू शकत नाही. या कलमाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली असून या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासीन मलिकला निवासस्थानातून ताब्यात घेतले. कोठीबाठ पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आले आहे. आगामी काळात आणखी काही फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 9:19 am

Web Title: jammu and kashmir separatist leader jklf chief yasin malik detained by police sc verdict on 35 a
Next Stories
1 पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत: ट्रम्प
2 नरेंद्र मोदी हे ‘प्राइम टाइम मिनिस्टर’; राहुल गांधी यांची टीका
3 भारताचा दबाव, जैशचे मुख्यालय पाकिस्तान सरकारच्या ताब्यात
Just Now!
X