23 September 2020

News Flash

काश्मीरमध्ये चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील वारपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी रात्रीपासून या भागात शोधमोहीम राबवली जात होती. अखेर पहाटे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले. यानंतर सुरु झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच स्थानिकांकडून चकमकीदरम्यान होणारा विरोध टाळण्यासाठी परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी पुलवामा जिल्ह्यात सोमवारी १६ तास झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ‘जैश ए मोहम्मद’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. या धुमश्चक्रीत एका मेजरसह लष्कराचे चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी देखील शहीद झाला होता. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. पिंगलन भागात ही चकमक झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 9:48 am

Web Title: jammu and kashmir sopore encounter security forces terroristmobile internet suspended
Next Stories
1 पाकिस्तान भारताशी युद्धाच्या तयारीत, रुग्णालयांना सज्ज राहण्याचा आदेश
2 Steve Irwin: ‘क्रॉकडाइल हंटर’ स्टीव्ह आयर्विनसाठी गुगलचे खास डुडल, जाणून घ्या स्टीव्हसंदर्भातील ३० भन्नाट गोष्टी
3 UN सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध, चीनने भारताला समर्थन दिल्याने पाकिस्तानची कोंडी
Just Now!
X