02 March 2021

News Flash

उमेदवार संतापला, मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची केली तोडफोड

पोलिसांनी उमेदवाराला अटक केली आहे

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) खराब झाल्याने मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. पण आंध्र प्रदेशात मतदानादरम्यान एका उमेदवाराचा पारा इतका चढली की त्याने थेट ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळून फोडून टाकलं. महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम खराब झाल्याने उमेदवार नाराज नव्हता. पोलिसांनी उमेदवाराला अटक केली आहे.

आंध्र प्रदेशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील गुंताकल विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता मतदान कऱण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव योग्य प्रकारे दिलं जात नसल्यावरुन मधूसुदन गुप्ता नाराज होते अशी माहिती मिळत आहे. यावरुन त्यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

गोंधळ झाल्याने काही वेळासाठी मतदान बंद झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मधुसूदन गुप्ता यांना अटक केली. यावेळी त्यांनी पोलिसांसोबतही गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 11:36 am

Web Title: jana sena mla candidate madhusudhan gupta smashes an electronic voting machine
Next Stories
1 बुऱखाधारी महिलांची पडताळणी नाही; बनावट मतदानाचा भाजपा उमेदवाराचा आरोप
2 होय! महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, ६३ टक्के वाचकांचे मत
3 राष्ट्रवादी हा पक्ष नसून पवार कंपनीने चालवलेली कंपनी – गिरीश बापट
Just Now!
X