20 September 2020

News Flash

‘इसिस’कडून दोनपैकी एका जपानी ओलिसाची हत्या

जपानच्या ज्या दोघांना इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) अतिरेक्यांनी ओलीस ठेवले होते, त्यातील एकाची हत्या करण्यात आली असून जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त

| January 26, 2015 12:52 pm

जपानच्या ज्या दोघांना इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) अतिरेक्यांनी ओलीस ठेवले होते, त्यातील एकाची हत्या करण्यात आली असून जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  
अॅबे यांनी सुरक्षा कंत्राटदार असलेल्या व इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी ठार मारलेल्या यारूना युकावा याच्या वडिलांशी संवाद साधला व दुसरा ओलीस असलेला मुक्त पत्रकार केन्जी गोटो याला सोडून देण्याची मागणी केली.  युकावा याच्या मृत्यूचा व्हिडीओ अतिरेक्यांनी शनिवारी  ऑनलाइन टाकला.
या दोन्ही जपानी ओलिसांच्या सुटकेसाठी २०० दशलक्ष डॉलर्सची खंडणी देण्याची आणि जॉर्डनमध्ये पकडलेली महिला अतिरेकी साजिदा अल रिशावी हिला सोडून द्यावे, अशी मागणी इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 12:52 pm

Web Title: japanese isis hostage murdered
टॅग Isis
Next Stories
1 शह आणि मात!
2 पाकिस्तानात वीजपुरवठा खंडित
3 जमात उद दवावरील बंदीची अंमलबजावणी पाकिस्तानने करावी- सुब्रता साहा
Just Now!
X