News Flash

जसवंत सिंह कृत्रिम श्वासोच्छ्वासावर

घरात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोमात गेलेल्या भाजपचे माजी नेते जसवंत सिंह यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे.

| August 10, 2014 01:47 am

घरात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोमात गेलेल्या भाजपचे माजी नेते जसवंत सिंह यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर शुक्रवारी रात्री महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक विशेष पथक सध्या लक्ष ठेवून असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या वतीने शनिवारी सांगण्यात आले.
सिंह यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी ते अद्याप कोमातून बाहेर आलेले नाहीत. गुरुवारी रात्री घरी पडल्यानंतर ११च्या सुमारास ७६ वर्षीय सिंह यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंह हे एनडीएच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून काम पाहिले आहे. बारमेरमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयानंतर भाजपमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2014 1:47 am

Web Title: jaswant singh vital parameters stable but he continues to be in coma defence ministry
टॅग : Defence Ministry
Next Stories
1 आशियासाठी अमेरिकेच्या विशेष दूताची नियुक्ती
2 उत्तर प्रदेशातील जातीय दंगली पूर्वनियोजित- राहुल गांधी
3 जे ६० वर्षात काही करु शकले नाही ते ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत- नरेंद्र मोदी
Just Now!
X